सदगुरू सेवाधाम ट्रस्ट ,वैष्णवनगर पंढरपुर परिचय -

वै.श्रीगुरूराज धोंडोपंत महाराज भोसेकर (दादा)यांच्या संकल्पानुसार सर्वत्र परमार्थमार्गाचा प्रसार होत आहेच.वै.दादांचे काही विशेष संकल्प होते. श्रीक्षेत्र पंढरपुर येथे ज्याप्रमाणे सर्व संताचे फडकर्‍यांचे, सांप्रदायाचे मठ आहेत,धर्मशाळा आहेत. तद्वत आपल्या सांप्रदायाचे ही एक स्थान असावे,मठ असावा,सांप्रदायाचे ज्ञानपीठ असावे.तसेच जन्मभुमी भोसे(करकंब,पंढरपुर) येथुन माघवारीस पायी चालत. दिंडीसोहळा यावा.वाळवंटात 'जय गुरू जय जय जय गुरू' असा नामघोष व्हावा.

वै.दादांचे सुपुत्र समर्थसदगुरू आबासाहेब धोंडोपंत भोसेकर महाराज यांनी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे धोंडोपंत भोसेकर महाराज यांनी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे "वै श्रीगुरूराज धोंडोपंत भोसेकर महाराज स्मारक"सदगुरू सेवाधाम ट्रस्ट ,वैष्णवनगर पंढरपुर या संस्थेची स्थापना केली आहे.याठिकाणी वै.दादांची समाधी प्रतिष्ठापना केली आहे.या ठिकाणी वै.दादांचा पुण्यतिथी सप्ताह श्रा.शु.प्रतिपदा ते पंचमी या काळात साजरा होतो. यावेळी येथे विविध नामवंत प्रवचन किर्तनसेवा करतात.भाविक भक्त अखंड भजन नामचिंतन पारायण करतात, अन्नदान करतात.आषाढीवारी महोत्सवातही अशाचप्रकारे उपक्रम होतात.

प्रतिवर्षी श्रीगुरूंचा माघवारी पालखी सोहळा पायी भोसे ते पंढरपुर असा येतो.वाळवंटामध्ये कासारघाटालगत थांबतो.याहीठिकाणी नामवंत प्रवचन किर्तनसेवा करतात.भाविकभक्त अखंड भजन -नामचिंतन अन्नदान करतात. वै.दादांचे ,समर्थ सदगुरू आबासाहेब धोंडोपंत भोसेकर महाराज यांचे मार्गदर्शनाखाली यापुढेही सदगुरूसेवाधामट्रस्ट वैष्णवनगर यांचे विद्यमाने विविध कार्य करणे योजिले आहे.

ध्येय आणि उद्दिष्टे -

१) अखिल विश्वामध्ये श्रीगुरू व श्री विठ्ठल नामाचा प्रसार करणे.

२) हिंचगेरी व वारकरी सांप्रदायी तत्वाचा प्रसार करणे.

३) सर्व धर्मातील तत्वांचा,ग्रंथाचा अभ्यास करणेसाठी ज्ञानपीठ उभारणे.

४) हिंचगेरी व वारकरी शिक्षणसंस्था उभारणे .

५) अध्यात्म ,वेदांत,ज्ञान ,ध्यानमंदिर ग्रंथालय उभारणे.

६) शालेय विद्यार्थ्यांना वेद ,शास्त्र ,पुराण श्रीसंतचरित्रे ,श्रीसंत साहित्य बाबत ज्ञान देणे,प्रबोधन करणे ,सुसंस्कार करणे.

७) संस्थेच्या संकेतस्थळावरून वेद,शास्त्र,पुराण ,श्रीसंतचरित्र ,श्रीसंतसाहित्यबाबत जनसामान्यांना प्रबोधन करणे.

८) सदगुरूसेवाधाम वैष्णवनगर पंढरपुर येथील श्रीसमाधीमंदिराचे शिखर पूर्ण करणे ,श्रीसभामंडपाचे कार्य पूर्ण करणे.

९) भक्तनिवास ,पाकशाळा ,अन्नछत्र ,गोशाळा निर्माण करणे.

१०) वैश्वीक शांती निर्माण करणे ,सुसंस्कॄत समाज निर्माण करणे.

११) समाजाच्या शारीरीक,मानसीक,वैचारीक,आरोग्यदायी ,आर्थिक शांतीपुर्ण स्वास्थ्यवर्धक जीवनशैलीच्या वर्धनासाठी कार्य करणे.

जय जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सदगुरू